मुंबई

मोखाड्यात वादळी पावसाचा धुमाकूळ

CD

मोखाडा, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (ता. ७) संध्याकाळी चांगलाच धुमाकूळ घातला. वादळी- वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या पावसात विजेचा धक्का बसून आठ जनावरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर मोखाड्यात वादळी- वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. या पावसात भोवाडी येथील सकऱ्या नवश्या सुनाड यांच्या तीन बैलांसह दोन गायी, शिवराम जाना सोरे, संदीप सोन्या पाघारी आणि परशुराम महादु पढेर या शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक बैल असे एकूण सहा बैल आणि दोन गायींचा जागीच मृत्यू झाला. तसेच तालुक्यातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

ऐन खरीप हंगाम सुरू होत असताना, ज्यांच्यावर बळीराजाची शेती अवलंबून आहे, त्या राबत्या जनावरांचा मृत्यू झाल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे मोखाडा तालुका सचिव ईश्वर बांबरे यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच, मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले यांनी येथील तलाठी, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून तहसीलदार कार्यालयाला अहवाल सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT