aditya thackeray sakal media
मुंबई

नियमबाह्य पार्ट्यांचे CCTV फुटेज तपासून थेट कठोर कारवाई - आदित्य ठाकरे

सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर बंदी

- समीर सुर्वे

मुंबई : मागील आठवड्यापासून कोविडचे रुग्ण (corona patients) वाढू लागले आहेत. ही तिसऱ्या लाटेची (corona third wave) सुरवात असू शकते. त्यामुळे नियमांचे काटेकाेर (corona rules) पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी (Ney year celebration parties in public places) नववर्षाच्या पार्ट्यांना बंदी (No permission) करण्यात आल्या आहेत. बंधिस्त ठिकाणच्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण (cctv footage checking) तपासण्यात येणार असून नियमबाह्यता आढळल्यास ते ठिकाण सिल (seal action) करण्यात येईल , अशी स्पष्ट ताकिद आज मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिले. (Strict action will be taken against breaking corona rules parties says aditya Thackeray)

महापालिका मुख्यालयात आज आदित्य ठाकरे यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यापासून वाढ होऊ लागली आहे. ओमिक्रॉनबाबत गांभिर्य बाळगायला हवे. कोविड रुग्णांसाठी 54 हजार बेड्स तयार आहेत. नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर बंदी आणण्यात आली आहे. तर, आस्थापनांनी नियम न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांचे सीसीटीव्ही तपासण्यात येतील. त्यात नियम पाळलेले नसल्याने थेट सिल ठोकण्याची कारवाई करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शाळा, महाविद्यालयत ३ तारखेपासून लसीकरण सुरु करण्याचे नियोजन केले आहेत. बुस्टर डोसचेही नियोजन सुरु आहे. सध्या शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय झालेले नाही. गरज पडल्यास पुढल्या आठवड्यात निर्णय घेता येईल असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टेरेस पार्ट्यांसाठी स्वयंशिस्त पाळा

31 डिसेंबरला इमारतींच्या गच्चीवर,संकुलातील मोकळ्या जागेतही पार्ट्या होतात. यावर बंदी नाही. इमारतीच्या गच्चीवर होणाऱ्या पार्ट्यांना बंदी नाही. मात्र, त्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT