एसटी Sakal
मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भोळ्याभाबड्या एसटी कर्मचाऱ्यांना खोटी आशा दाखवून न्यायालयाचा निर्णय जसाच्या न सांगता दिशाभूल करून राजकीय भावनेने व द्वेषाने ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्या राहत्या घरावर हल्ला करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तथाकथित नेतृत्वाला जबर शिक्षा करावी. अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. काल आकस्मिकपणे त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बरगे यांनी संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसनेते भाई जगताप यांच्या सूचनेवरून पवार यांची आज सदिच्छा भेट घेतली.

त्या नंतर पत्रकारांशी बोलताना बरगे म्हणाले, की माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सुस्पष्ट व सकारात्मक असल्याने तसेच या निर्णयापूर्वीच सरकारने एक मागणी वगळता इतर सर्व मागण्या मान्य केल्याने त्या दोघांच्या निर्णयाचा आदर राखत लवकरच सर्व एसटी कर्मचारी आपल्या कामावर रुजू होतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत असतानाच त्यांची दिशाभूल केली जाते आहे, असेही ते म्हणाले. भविष्यात एसटीचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने पालकत्वाची भूमिका स्वीकारावी आणि कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या सुद्धा तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी या वेळी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलेली सुधारित वेतन वाढ ही सर्व कर्मचाऱ्यांना सारखी नसून , त्यामधील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. व त्या परिवहन मंत्री अनिल परब नक्की दूर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय संरक्षण देण्याच्या दृष्टीने मेडिक्लेम योजना त्वरित अमलात आणावी, अशी देखील मागणी यांनी यावेळी केली. पुढील चार वर्षे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा जबाबदारी आणि हमी राज्य शासनाने उचलली आहे. याबद्दल बरगे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. आहेत. याबरोबरच एसटीच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक निधीची तरतूद प्रत्येक अर्थसंकल्पात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी फैयाज पठाण, चंदन राठोड हे सुद्धा हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT