File Photo
File Photo 
मुंबई

दुचाकीसाठी जाळून घेणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वडिलांनी शाळेत जाण्यासाठी दुचाकी न दिल्याने न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाऊन स्वत:ला जाळून घेतलेल्या शिवम दीपक यादव (17) या विद्यार्थ्याचा अखेर उपचारादरम्यान शनिवारी (ता. 16) रात्री मृत्यू झाला. वडिलांनी दुचाकी न दिल्याने रागाच्या भरात शिवमने शुक्रवारी सकाळी हायस्कूलमध्ये स्वतःला जाळून घेतले होते.

कळंबोली भागात राहणाऱ्या शिवम यादव या 11 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाण्यासाठी वडिलांकडे दुचाकीची मागणी केली होती; मात्र वडिलांनी त्याला नकार दिल्याने रागाच्या भरात शिवमने त्याच दुचाकीमधील पेट्रोल एका बाटलीत काढून घेत आपले हायस्कूल गाठून दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात जाऊन पेट्रोलच्या साह्याने स्वतःला जाळून घेतले होते.

यात शिवम गंभीररीत्या भाजल्याने हायस्कूलच्या शिक्षकांनी त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते; मात्र शिवम 90 टक्के भाजल्याने त्याला पुढील उपचारासाठी ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी शिवमचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी कराड येथे नेल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अर्चना चिवटे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT