मुंबई

वाढदिवशी झालेल्या अपघातात दोन विद्यार्थी ठार

दिनेश गोगी

उल्हासनगर : बदलापूरजवळील बारवी डॅम येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणाऱ्या उल्हासनगरातील एसएसटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या इर्टिगा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार झाले असून, सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पालकांसह नातलगांनी रुग्णालयात धाव घेऊन टाहो फोडला आहे.

सकाळी अकराच्या सुमारास एसएसटी कॉलेजमधील 6 विद्यार्थी व 4 विद्यार्थिनी मैत्रिणीचा वाढदिवस बारवी डॅम येथे साजरा करण्यासाठी  इर्टिगा कारने जात असतानाच सोनावले गावाजवळील मूळगावच्या वळणावर गाडी तीनदा पलटी झाली. त्यात नूपण संजय तायडे आणि रुतिका महेंद्र कदम हे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले तर अक्षता भालेराव, प्रतिक साबळे, निखिल केळकर,कमलेश राजपूत,गणेश सिंग, संकेत वाडेकर हे सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवा, मुंबई रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नूपण हा कुर्ला कॅम्प सर्टिफाईड शाळा पाण्याच्या टाकीजवळ राहणारे रिक्षाचालक संजय तायडे यांचा मुलगा आहे. ही दुर्दैवी घटना समजताच रिक्षाचालकांनी शासकिय मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेतली. रुतिका कदम ही विद्यार्थिनी पिसवली कल्याण येथे राहत होती. 

माझी रुतिका कुठंय...

रुतिका कदम ही पिसवली कल्याण येथे राहत होती. सकाळी कामाला गेलेले तिचे वडील महेंद्र कदम हे मुलगी अपघातात ठार झाल्याबद्दल अनभिज्ञ होते. त्यांना मुलगी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आल्यावर त्यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास कामावरून थेट रुग्णालय गाठले. त्यांनी त्यांची पत्नी ही रुग्णालयाच्या दारात रडत असल्याचे आणि नातलग तिच्यासोबत असल्याचे बघितले. पती येताच पत्नीने टाहो फोडला. कदम यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि माझी रुतिका कुठंय, अशी विचारणा पाणावलेल्या डोळ्यांनी डॉक्टर, नातलगांना केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT