car sakal
मुंबई

कारसह खाडीच्या चिखलात अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

कारमधून फिरायला कोलशेत खाडी रोड परिसरात गेले असताना, ती रस्ता सोडून खाडी किनारच्या चिखलात गेली

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कारमधून फिरायला कोलशेत खाडी रोड परिसरात गेले असताना, ती रस्ता सोडून खाडी किनारच्या चिखलात (Mud)गेली आणि त्यामध्ये अडकली. ही घटना मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास समोर आली. त्या कारमध्ये सहा जण अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल(Thane Municipal Regional Disaster Management and Fire Brigade) या विभागांना यश आले आहे. सुदैवाने यामध्ये कारमधील कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

अपघातग्रस्त टोयोटा फॉर्च्युनर कार ही हरेंद्र सिंग यांच्या मालकीची असून त्या कारवर चालक संकेत सिंग (२८) हा आहे. त्याच्यासह कारमध्ये रोहित नायर, हेनेरी जोन,ईश्वरी खैरे,पूजा रतुरी आणि अश्विनी कुमार हे सहा चेंबूर वरून ठाण्यातील वागळे इस्टेट मधील एका हॉटेलमध्ये आले होते, त्यानंतर ते श जण तेथून फिरायला कोलशेत खाडीरोड परिसरात मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गेले होते. याचवेळी ती कार रस्ता सोडून खाडी किनारच्या चिखलात जाऊन अडकली. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस,ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेत, बचाव कार्य सुरू केले. कार मध्ये अडकलेल्या त्या सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. तसेच या वेळी १ आपत्कालीन निविदा आणि १ -रेस्क्यू वाहन आणि १ हायड्रा क्रेनला पाचारण केले होते. तसेकंग ती कारही बाहेर काढण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.(Thane News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT