शेवटचा रविवार असल्याने सर्वच उमेदवारांनी दिवसभर निवडणूक प्रचार करण्यास भर दिला. ओवळा-माजिवडा मतदारसंघातील उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती.
शेवटचा रविवार असल्याने सर्वच उमेदवारांनी दिवसभर निवडणूक प्रचार करण्यास भर दिला. ओवळा-माजिवडा मतदारसंघातील उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती. 
मुंबई

ठाण्यात रविवार ठरला प्रचारवॉर!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मुख्य नेत्यांच्या सभा झाल्यानंतर प्रचारासाठी उरलेल्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठत उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रभागातील कोपरान्‌ कोपरा पिंजून काढताना दिसून आले. प्रचार रॅली, गृहसंकुलांना भेटीगाठी देत मतदारराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवाराने रविवारी केला. उन्हाचा तडाखा जाणवत असला तरी त्याची तमा न बाळगता प्रत्येक घरी जाऊन मतदारांची मनधरणी करण्याकडे सर्वपक्षीय उमेदवारांचा कल होता.

प्रचारफेरी, समाजमाध्यमे, पथनाट्यांचा जागर अशा नानारंगी प्रचारातून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत प्रचार केला. प्रचारासाठी हातात अवघे पाच दिवस राहिले आहेत. त्यात रविवारची सुट्टी ही शेवटची सुट्टी असल्याने; तसेच रविवारमुळे मतदारही घरी असल्याचा फायदा घेत उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठका, संस्थांच्या भेटीगाठी यावर अधिक भर दिला होता. 

शेवटच्या टप्प्यात थेट मतदारांच्या दाराशी जात ‘आपल्यालाच मतदान करा’, असे आवाहन केले जाणार आहे. या प्रचारास रविवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली. एका दिवसात दहा ते बारा प्रभाग उमेदवारांनी पालथे घातले. मतदारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी ते पुढे काय काय प्रयत्न करणार आहेत, यावर बैठकीत अधिक भर दिला जात होता. 

उन्हाचा तडाखा
भर दुपारी उन्हाचा तडाखा बसत असला, तरीही शेवटचा दिवस असल्याने उन्हाची फिकीर न करता उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचार करताना दिसून आले. भर दुपारीही बैठकांवर उमेदवारांनी भर दिलेला दिसून आला. पायाला भिंगरी लागल्यागत उमेदवार रविवारी प्रचार करत असून प्रभागातील कोपरा न कोपरा पिंजून काढण्यावर भर दिला जात होता. मतदार नाराज होऊ नये, कोणी मतदार नाराज असतील, काही कामे झाली नसतील, तर संबंधितांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आश्वासक प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी 
देण्यात येत होते.

प्रयत्न करू; पुन्हा संधी द्या!
रस्ते, पाणी या समस्या मतदारांच्या प्राधान्याने असून त्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी गळ या वेळी उमेदवारांना मतदारांनी घातली. काही ठिकाणी उमेदवारांना प्रतिप्रश्नही केले जात होते; परंतु अशा प्रश्नांना समर्थपणे टोलावून प्रयत्न करू, पुन्हा संधी द्या, अशी विनंती उमेदवार करीत होते. उमेदवारांबरोबरच कार्यकर्तेही सक्रिय झाले असून ज्या ठिकाणी उमेदवार हजर नाहीत, त्या भागात कार्यकर्ते भेटीगाठी देत प्रचार करीत आहेत. प्रचारासाठी सुट्टीचा दिवस अधिक प्रभावी असल्याने रविवारचा मुहूर्त गाठल्याचे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT