मुंबई

तरुणीचा घरात संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कासा : शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस चारोटी येथे एका 30 वर्षीय तरुणी आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर काळे डाग आणि पायावर मार लागल्याच्या खुणा आढळून आल्या असल्यातरी हत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

वैशाली शांताराम बुंधे (30) असे मृत तरुणीचे नाव आहे. राहत्या घरीच तिचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान तिच्या शरीरावर संशयास्पद खुणा आढळून आल्यामुळे नेमके मृत्यूचे कारण काय असावे याबद्दल चर्चा होत आहे. वैशालीच्या मृत्यूबाबतची
 माहिती तिच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी कासा पोलिसांत फिर्याद दाखल केली.

त्यांनतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला; मात्र मृत मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीस अटक करावी, तसेच मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवावा, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविला.  सध्या कासा पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पुढील तपास कासा पोलिस करत आहेत.  


web title : Suspected death of young girl in house

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT