Suspended BJP Nupur Sharma absent for mumbai Paydhuni Police Station  inquiry
Suspended BJP Nupur Sharma absent for mumbai Paydhuni Police Station inquiry esakal
मुंबई

निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा चौकशीसाठी गैरहजर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आज मुंबईतील पायधुनी पोलिस स्टेशनसमोर हजर होणार होत्या मात्र नुपूर शर्मा हजर झाल्या नाहीत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या समन्सला नुपूर शर्माकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.लवकरच मुंबई पोलीस नुपूर शर्माला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते, त्यानंतररझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याशी संबंधित एका घटनेचा उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच गोंधळ सुरू झाला.

नुपूर शर्मा विरोधात मुंबई , ठाणे पुणे आणि हैदराबादमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय सुन्नी बरेलवी संघटनेने रझा अकादमीनेही नुपूरविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबईत आयपीसीच्या कलम 295A, 153A आणि 505B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच हैदराबादमधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नुपूरविरुद्ध आयपीसीच्या कलम १५३ (ए), ५०४, ५०५ (२) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT