मृत्यू sakal
मुंबई

उल्हासनगरात पुजाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

पुजाऱ्याची आत्महत्या की हत्या! प्रतीक्षा पोस्टमार्टेम रिपोर्टची

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरवाजाला बाहेरून कुलूप आणि आत पुजाऱ्याचा लटकलेला संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.त्यामुळे ही आत्महत्या की हत्या हा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला असून त्यासाठी पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा तपास अवलंबून आहे.

उल्हासनगर कॅम्प 4 ओटी सेक्शन मधील पूज्य पंचायत हॉलच्या बाजूला असणाऱ्या सुमन अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर जितू शर्मा हा 38 वर्षीय अविवाहित पुजारी राहत होता.गुरुवार पासून या फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होते.आज या फ्लॅट मधून अचानक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने इमारतीतील रहिवाश्यांनी जितूचा भाऊ अमित शर्माला फोन करून सांगितले.अमितने विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी सुमन अपार्टमेंट गाठले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कुलूप तोडून घरात पाहिले असता जितू शर्मा याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.बाहेरून कुलूप आणि आत लटकलेल्या अवस्थेत मृतदेह हा प्रकार संशयास्पद असला तरी पुजारी जितू शर्मा याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली हे पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT