तैवानच्या जी फाँग यांची सायकलवरून भारतभ्रमंती
तैवानच्या जी फाँग यांची सायकलवरून भारतभ्रमंती 
मुंबई

तैवानच्या जी फाँग यांची सायकलवरून भारतभ्रमंती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तैवानमध्ये राहणारे ५३ वर्षांचे सायकलपटू सध्या मुंबईच्या रस्त्यावर फिरून भारताच्या संस्कृतीविषयी जाणून घेत आहेत. जी फाँग असे त्यांचे नाव. भारतीय संस्कृती जवळून पाहावी आणि तिचा अनुभव घेता यावा म्हणून त्यांनी दिल्ली ते मुंबई असा तब्बल १५०० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. ३ सप्टेंबर रोजी दिल्लीहून सायकलने प्रवास करण्यास त्यांनी सुरुवात केली. राजस्थान आणि गुजरात राज्ये सायकलने पार करीत २३ दिवसांनंतर बुधवारी (ता. २५) ते मुंबईत दाखल झाले. फाँग यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 

जी फाँग एका चहाच्या कंपनीत काम करतात. भारतातील अनेक भागांतील प्रवास त्यांना अनुभवायचा होता. त्यासाठी फाँग यांनी ३ सप्टेंबर रोजी दिल्लीहून सायकलने प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान अनेकांची भेट घेत वेगवेगळ्या ठिकाणी राहत त्यांनी भारतीय संस्कृती जाणून घेतली; मात्र काही दिवसांनंतर त्यांच्याकडचे पैसे संपले. नंतर खेडेगावातील गावकऱ्यांनी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली. दिवसाला जवळपास सायकलने ८० किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी राजस्थान व गुजरात राज्ये पालथी घातली. 

पुन्हा भारतात येणार...
जी फाँग यांनी १५०० किलोमीटरचा सायकलचा प्रवास २३ दिवसांत पूर्ण केला. पुढील सहा महिन्यांनी पुन्हा भारतात येऊन सायकलची सफारी करण्याचा मानस असल्याचे फाँग यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT