Narayan Rane-Nitesh Rane in Disha Salian death Case
Narayan Rane-Nitesh Rane in Disha Salian death Case esakal
मुंबई

राणे पिता-पुत्रावर कारवाई करा; दिशा सालियानच्या पालकांची राष्ट्रपतींकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : : अभिनेता सुशांत राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियान हिच्या मृत्यूचे रहस्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावरून राज्यात राजकारण तापले असताना आता दिशा सालियानच्या पालकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहित केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास आपल्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

नारायण राणे, नितेश राणे व अन्य काही जण आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती पसरवत असून आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिशा सालियनच्या पालकांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी पत्रात राष्ट्रपतींना विनंती केली आहे की, भाजप नेते असलेले पिता-पुत्रांकडून आमचा होणारा छळ थांबवा. ते पुढे म्हणाले की, आमच्या मुलीच्या निधनानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यासारख्या काही राजकारण्यांनी त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याची वैर असल्याने या प्रकरणात उडी घेतली. त्यांच्या वादात आम्हालाही ओढून त्यांनी आमचे जीवन दयनीय केले आहे.

राणे यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि ते खोटे असल्याने ते कोणतेही पुरावे देऊ शकत नाहीत याची आम्हाला जाणीव आहे, असेही दिशा सालियानच्या पालकांनी म्हटले आहे. दिशा सालियानच्या पालकांनी विनम्रपणे राष्ट्रपतींना विनंती केली आहे की, त्यांनी योग्य त्या अधिकाऱ्यांना यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

पुरावा मिळाला नाही

दिशा सालियान हिने अभिनेता सुशांत राजपूत यांच्या मृत्यूपूर्वी मालाड येथील एका इमारतीवरून उडी मारून ८ जून २०२० ला आत्महत्या केली होती. दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी तपासानंतर ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणी कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT