मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील महिला डब्यात सुरक्षेसाठी आणि आत्पकालीन वेळी गार्डशी संपर्क करता यावा, यासाठी ‘टॉकबॅक सिस्टिम’ बसविण्यात येणार आहे. सध्या प्राथमिक चाचणीसाठी दोन लोकलमध्ये हि सुविधा बसविण्यात आली आहे.
महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, आपत्कालीन वेळी गार्डशी संपर्क करता यावा, यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये टॉक बॅक सिस्टीम बसविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासन हि सुविधा बसविणार आहे. 12 डब्यांच्या लोकलच्या पाच डब्यात 15 टॉक बॅक सिस्टीम बसविण्यात आली आहे. तर, पुढील 127 लोकलमध्ये डिसेंबरपर्यंत हि सुविधा महिला प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
काय आहे टॉक बॅक सिस्टीम
- महिला प्रवाशांना आपत्कालीन प्रसंगी सरळ लोकल गार्डशी बोलता येण्यासाठी ही सुविधा आहे. यावेळी महिलांना तीन सेकंद बटन दाबून सोडायचे आहे.
- महिला प्रवासी या सिस्टीमचे बटन दाबताच गार्डला ऑडिओ-व्हिज्युअल सिग्नल देऊन सतर्क केले जाईल.
- सिस्टीममध्ये मायक्रोफोन, स्पीकर, पुश बटन आहे.
- महिला डब्याच्या दरवाज्याजवळ ही सुविधा आहे.
- या सिस्टममुळे वेगवेगळ्या डब्यातून वेगवेगळ्या प्रवाशांकडील अनेक कॉल घेऊ शकते. यासह 120 सेकंदानंतर स्वयंचलितपणे रीसेट होऊ शकते.
Talk back system for female passengers of Central Railway Preliminary testing of talk back system begins in two locales
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.