taloja jail sakal
मुंबई

Taloja Jail : तळोजा कारागृहाची सुरक्षितता धोक्यात; अज्ञात व्यक्तीकडुन ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण

विविध दशतवादी संघटनेचे दहशतवादी, गँगस्टर, नक्षलवादी यांच्यामुळे अतिसंवेदनशील बनलेल्या तळोजा कारागृहाची अज्ञात व्यक्तीने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - विविध दशतवादी संघटनेचे दहशतवादी, गँगस्टर, नक्षलवादी यांच्यामुळे अतिसंवेदनशील बनलेल्या तळोजा कारागृहाची अज्ञात व्यक्तीने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे कारागृहाचे बेकायदेशीररीत्या व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने सदरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकुन तळोजा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षितता धोक्यात आणली आहे. खारघर पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीने गत 17 जानेवारी रोजी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे तळोजा कारागृह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचे विनापरवानगी अवैधरित्या चित्रण केले. त्यानंतर सदरचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर तळोजा कारागृह प्रशासन खडबडुन जागे झाले. त्यानंतर कारागृह प्रशासनाने सदर व्हिडीओ बाबत माहिती घेतली असता, तळोजा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रातील कैद्यांचे व जेल परिसराचे 9.42 वाजता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण केल्याचे आढळून आले.

त्यानंतर सदरचा व्हिडीओ आर्चिस लिमये याच्या अकाउंटद्वारे राहुल उत्तेकर इन स्टोरी या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आल्याचे आढळुन आले. तळोजा मध्यवर्ती कारागृहची सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने तसेच शासकीय गुप्ततेचा भंग करण्याच्या उद्देशाने सदर प्रकार करण्यात आल्याचे आढळुन आले.

या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने तुरंग अधिकाऱयांनी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. तसेच सदर व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात सध्या 3500 कैदी आहेत. यात विविध दहशतवादी संघटनेचे दहशतवादी, विविध गँगचे गँगस्टर, नक्षलवादी तसेच गंभीर स्वरुपाच्या गुह्यातील कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे तळोजा कारागृह हे अतिसंवेदनशील बनले आहे. अशा परिस्थितीत अतिसंवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या कारागृहातील अज्ञात व्यक्तीने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण केल्याने कारागृहातील सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Darekar: पालिकेसाठी ठाकरेंचे मराठीचे सोंग, भाजप नेत्याची बोचरी टीका

मंचावर तेजश्री प्रधानने अचानक ऐकलं 'होणार सून मी या घरची' मालिकेचं नाव; निवेदकाला थांबवत एकच गोष्ट म्हणाली...

Pune Crime News : इकडे मुख्यमंत्र्यांनी पोलीस ठाण्याचं उद्घाटन केलं, तिकडे तिघांनी सराफा दुकानावर दरोडा टाकला...पुण्यातील धक्कादायक प्रकार

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत; 'अंधेरा' या सिरीजमध्ये साकारणार दमदार भूमिका!

Sharanu Hande Case: शरणू हांडेचं अपहरण का झालं? पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत घटनाक्रमच सांगितला!

SCROLL FOR NEXT