मुंबई

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासाला मुदतवाढ; 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली

तेजस वाघमारे

मुंबई : शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी लोकलमधून प्रवास करण्यास रेल्वे मंत्रालयाने 10 डिसेंबरपर्यंत परवानगी दिली होती. ही मुदत रेल्वे मंत्रालयाने पुन्हा वाढविली असून शिक्षकांना आता 31 जानेवारीपर्यंत लोकल प्रवास करता येईल.

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षणसंस्थांना शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनाही रेल्वे प्रशासनाची सुविधा देण्याची मागणी शिक्षण विभागाच्यावतीने रेल्वेला करण्यात आली होती. 23 नोव्हेंबरपासून राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्गदेखील सुरू झाले. राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयाने शिक्षकांना 10 डिसेंबरपर्यंत रेल्वे प्रवास करण्याची मुदत दिली होती. ही मुदत संपताच रेल्वेने शिक्षकांना तिकीट देणेही बंद केले. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यात अडचणी आल्या. अखेर रेल्वे मंत्रालयाने शिक्षकांना 31 जानेवारीपर्यंत रेल्वे प्रवासाला मुदतवाढ दिली आहे. यामुळे शाळात हजेरी लावणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षकांना परिक्षेसाठी रेल्वे परवानगी मिळाली होती. मुदत संपल्यानंतर शिक्षकांचे रेल्वे टिकिट बंद केले होते. यामुळे शिक्षकांना प्रवास करण्यास त्रास झाला. त्यामुळे 50 टक्के शिक्षकांना शाळेत बोलवू नका, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे शिक्षक परिषद मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

teachers teaching staff Deadline extended to 31 January of local train mumbai

================================ 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT