मुंबई

ठाण्यात खास महिलांसाठी तेजस्विनी बसेसचा ताफा 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : केवळ महिला प्रवाशांसाठी तब्बल पन्नास "तेजस्विनी' बसेस टीएमटीच्या ताफ्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून शुक्रवारी (ता. १६) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या बसेस खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध होणार आहेत. 

गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांना प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी या महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी टीएमटीमध्ये ५० तेजस्विनी बसेस घेण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. पण हा निर्णय झाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव मात्र स्थायी समितीत येत नव्हता. अखेर शुक्रवारच्या बैठकीत हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करण्यात आला आहे.

या तेजस्विनी बसेससाठी खास महिला चालक आणि वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या बसेससाठी महिला तिकीट तपासनीसाचीदेखील नेमणूक करण्यात येणार आहे. मात्र, या नव्या बसेस टीएमटी प्रशासनाच्या अधिपत्याखाली येणार नाहीत; तर या बसेस जीसीसी तत्वावर खासगी ठेकेदारामार्फत चालविण्यात येणार आहेत. त्यावर चालक, वाहक नेमण्याची प्रक्रिया ही ठेकेदाराचीच असणार आहे. शिवाय बसेसची निगा, देखभाल करण्याची जबबादारीदेखील संबंधित ठेकेदाराची असणार आहे. यापूर्वी खासगी ठेकेदाराकडे गाड्या देताना किमान वाहक टीएमटी प्रशासनाचा ठेवला जात होता. पण, या बसेसवर वाहकदेखील खासगी ठेकेदाराचा नेमण्यात येणार आहे. 

तेजस्विनी बसेस जीसीसी अंतर्गत चालविल्या जाणार आहेत. खासगी कंत्राटदाराकडे या बसेसच्या देखभालीचे काम असणार आहे. महिलांना प्रवासासाठी स्वतंत्र बस उपलब्ध व्हावी आणि त्यांचा प्रवास अधिक सुरिक्षत व्हावा, या हेतूने राज्य शासनाने तेजस्विनी बस योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण तीनशे बसेस मिळणार आहेत. त्यापैकी पन्नास बसेस ठाणे शहरासाठी उपलब्ध होणार आहेत. 


या 50 बसेससाठी केंद्राकडून सहा कोटी रुपयांचे अनुदान टीएमटीला मिळाले आहे. अशोक लेलॅण्ड कंपनीकडून या बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. या बसेस टीएमटीच्या ताफ्यात आल्यास भविष्यात महिलांसाठी टीएमटीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 
- उपायुक्त संदीप माळवी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT