मुंबई

आजपासून तापमानात घट हवामान विभागाचा अंदाज 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे मुंबईतील तापमानात वाढ झाली होती. परंतु, बुधवारपासून (ता. 6) कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. 

सध्या राज्यातील थंडीसाठी अनुकूल परिस्थिती नाही. थंडीसाठी आवश्‍यक "वेस्टर्न डिस्टर्बन्स' ही स्थिती अफगाणिस्तानावर तयार झाली आहे. लवकरच ही स्थिती देशाच्या उत्तरेकडील भागावर निर्माण होईल. त्यानंतर हवेच्या प्रवाहांत बदल घडण्याची शक्‍यता आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले की तापमानात घट होते. असा बदल लवकरच होईल, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. कमाल तापमान मंगळवारी दोन अंशांनी कमी होऊन 33 अंश सेल्सिअस नोंदवले गेले; ते बुधवारी 31 अंशांपर्यंत कमी होईल. किमान तापमान मात्र एका अंशाने वाढून 20 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT