Rahul Gandhi and santosh kene sakal
मुंबई

ठाकरे गटाची काँग्रेसच्या संतोष केणे यांना ऑफर : भूमिपुत्र कार्ड चालविण्याकडे ठाकरे गटाचा कौल

कल्याण लोकसभेसाठी महायुतीचे अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण लोकसभेसाठी महायुतीचे अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार त्यातच भूमिपुत्रांना उमेदवारी देऊन महायुतीची कोंडी करण्याची व्यूहरचना ठाकरे गटाकडून आखली जात आहे. स्थानिक भूमीपुत्रांचा पाठिंबा आणि ठाणे, रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे संतोष केणे यांना ठाकरे गटाकडून ऑफर आली असून केणे हाताच्या पंजावर ठाम राहतात की हातात मशाल घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करतात हे आता पहावे लागेल.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. महायुतीने अद्याप येथील आपला उमेदवार घोषित केलेला नसला तरी शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावे प्रचार करण्यास महायुतीने सुरुवात केली आहे. यामुळे शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असे चित्र आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून देखील तेवढ्याच ताकदीचा उमेदवार देण्यासाठी चाचणी सुरू आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते.

मात्र स्थानिक उमेदवारास उमेदवारी देण्याकडे ठाकरे गटाचा कल सध्या दिसून येत आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांना ही उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र गेल्या काही दिवसांपासून भोईर यांचा शिंदे गटाकडे वाढलेला कल लक्षात घेता भोईर यांचे नाव काहीसे पाठी पडले आहे. त्यातच कल्याण येथील विजय साळवी यांच्या नावाची देखील चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव संतोष केणे यांचे नावाची चर्चा सुरू झाली आहे.

कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून काँग्रेसचे सचिव संतोष केणे यांना उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचे देखील समजत आहे. संतोष केणे यांना वारकरी आणि भूमिपुत्रांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याने ही ऑफर दिल्याची आता चर्चा रंगू लागली आहे.

याबाबत संतोष केणे यांना विचारले असता ते म्हणाले, खऱ्या अर्थाने काँग्रेस बोटातून माझे नाव आहे आणि मी इच्छुक आहे. पण कोठा हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला आहे. महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो येथील कार्यकर्त्याला स्वीकारावा लागेल. या विभागात जर भूमिपुत्र उभा राहिला तर येथील संघटनांचा त्यांना पाठिंबा राहील. स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक समस्या असून भूमिपुत्र लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सोडवू शकतो सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचा आग्रह आहे की मी यात उतरून पाऊल उचलून यामध्ये बदल करणे गरजेचे आहे.

भूमिपुत्रांना न्याय एक भूमीपुत्रच देऊ शकतो. देशात सध्या जे काही सुरू आहे त्यात एका खासदारकीच्या सीट मुळे सुद्धा बदल घडू शकतो आणि तो यापूर्वी झालेला आहे. जनतेचा तसेच महाविकास आघाडीचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारावा लागेल.

संतोष केणे काँग्रेस माजी नगरसेवक असून विविध संघटनाचा त्यांना पाठींबा आहॆ. तसेच नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देणे, 27 गावातील विविध प्रश्न, 10 गावातील ग्रोथ सेंटर, कल्याणजी रोड अलिबाग वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न नेवाळी भाल येथील जमीन प्रश्न तसेच गावठाण कोळीवाडे गावठाण विस्तार क्लस्टर मोहरा रेती बंदर येथील फ्लॅट धारकांचे प्रश्न असे अनेक भूमिपुत्रांचे प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी काँग्रेसचे संतोष केणे हे पुढे राहिले आहेत.

यामुळे केने यांना भूमिपुत्रांचा पाठिंबा आहे.कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा, कल्याण पूर्व आदी भागातील शिवसेना शिंदे गटा विरोधात असलेली भाजपची नाराजी, भूमीपुत्रांमध्ये असलेला रोष याचा फटका शिंदे गटास पडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT