Sanjay raut Eknath Shinde 
मुंबई

Sanjay Ruat: "आम्ही जो आरपार घातलाय..."; एकनाथ शिंदेंच्या 'बांबू' वक्तव्यावर ठाकरे गटाचे शिवराळ प्रत्युत्तर

Sanjay raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांच्या प्रत्युत्तरानंतर शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- काही लोकांना बांबू लावला पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. यावर संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांच्या प्रत्युत्तरानंतर शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो बांबू घातला आहे, तो अजून निघालेला नाही. त्यांच्या महायुतीला आम्ही बांबू घातला आहे. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू दिसतोय, इतक्या आतमध्ये तो बांबू गेला आहे, अशी कडवट टीका राऊतांनी केली.

विधानसभेला हा बांबू आरपार जाणार आहे. हे लिहून घ्या. याच बांबूचे फटके लोकं रस्त्या-रस्त्यावर मारतील. बांबूचे वेगवेगळे बाय प्रोडक्ट असतात. या बाय प्रोडक्टचे प्रयोग त्यांच्यासोबत होणार आहेत. लोकसभेला जो बांबू गेला आहे. तो कसा काढावा. ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा हा प्रश्न त्यांना पडला आहे, असं राऊत म्हणाले.

मोदी-शाह असताना बांबू घालत आहेत. त्यामुळे ते आता बांबूवर अभ्यास करतील. त्यांना बांबूवर एखादी डिग्री मिळू शकते. पण, ती डिग्री बोगस असेल असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला. दरम्यान, यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी राऊतांवर टीका केली आहे. या बाबूंचा संजय राऊत यांना त्रास होईल, असं ते म्हणाले आहेत.

संजय राऊत खरंच बांबू घातला पाहिजे. शरद पवारांनी देखील यांना बांबू घातला आहे. बांबू घालण्याची संस्कृती यांनीच सुरु केली आहे. आता हा बांबू निघणार नाही. त्यांना याचा पुढे त्रास होणार आहे, असं संजय शिरसाठ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT