Thackeray group will be aggressive in Datta Dalvi case What was the plan in the meeting on Matoshree 
मुंबई

दत्ता दळवी प्रकरणी ठाकरे गट देणार जशासतसं उत्तर; मातोश्रीवरील बैठकीत ठरला प्लॅन!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.

कार्तिक पुजारी

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. तसेच दत्ता दळवी यांच्या अटकेबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. पण, बैठकीसाठी अनेक आमदारांनी दांडी मारल्याचं दिसलं.

अवकाळी पाऊस, मराठा-ओबीसी आरक्षण असा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेराचे या संदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जाते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले. (Thackeray group will be aggressive in Datta Dalvi case What was the plan in the meeting on Matoshree)

दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ठाकरे गट आक्रमक होऊन जसास तसे उत्तर देण्याची बैठकीत भूमिका घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे ठाकरे विरोधात शिंदे अशी लढाई पाहण्यास मिळू शकते.

दत्ता दळवी यांच्या गाडीवर हल्ला करण्याची घटना घडून सुद्धा अनेक आमदारांनी बैठकीला गैरहजरी लावली. ठाकरे गटाच्या या महत्त्वाच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर होते. त्यामुळे आमदारामध्ये गांभीर्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.बैठकीला ऋतुजा लटके, विलास पोतनीस, सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , अजय चौधरी इत्यादी नेते आले होते.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक झाली असून त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका कार्यक्रमात बोलताना दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT