thief arrested sakal media
मुंबई

ठाणे : दानपेटी चोराला दोन तासांत अटक

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : नवरात्रोत्सवादरम्यान (Navratri Festival) देवीच्या मूर्तीसमोरील दानपेटी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला (thief arrested) अवघ्या दोन तासांत पोलिसांनी पकडले. दानपेटीतील चिल्लर घेऊन १६ वर्षीय मुलगा नोटा घेण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या हाती लागला. त्याची रवानगी कासारवडवली पोलिसांनी (kasarwadi police) भिवंडीच्या बालसुधारगृहात (Bhivandi borstal) केली आहे.

कासारवडवली येथील ब्रह्मांड फेज-५ येथील नवरात्रोत्सवातील लाकडी दानपेटीच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ३३०० रुपयांची नाणी दानपेटीत होती. त्यानुसार परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक किशोर खैरनार, निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. दरम्यान, परिसरातील रिक्षाचालकांकडे चिल्लर देऊन नोटा घेण्यासाठी आणि भंगारवाल्याकडे लाकडी दानपेटी विकण्यासाठी एक मुलगा फिरत असल्याची माहिती पथकला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक सचिन सरडे यांच्या पथकाने सापळा रचून १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दानपेटी व रक्कम जप्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्यावर ट्रम्प इफेक्ट! एका दिवसात मोठा उलटफेर! जाणून घ्या आजचे ताजे भाव

Monsoon El Nino Impact India : यंदा एल निनोचा इशारा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Thalapathy Vijay: बहुमतापासून १० आमदार दूर; काँग्रेसच्या ५ जागांवर TVK चा खेळ कसा फिरणार? सत्ता स्थापनेची समीकरणे कशी बदलणार

Congress Muslim Candidates Success : काँग्रेसच्या विजयी उमेदवारांत मुस्लिम सर्वाधिक; आसाम ते केरळपर्यंत 'मुस्लिम' उमेदवारांचाच स्ट्राइक रेट जबरदस्त!

Latest Marathi News Live Update : काळाराम मंदिरावर आज पुन्हा झळकणार भगवी धर्मध्वजा, धार्मिक वैभवाचा ऐतिहासिक क्षण

SCROLL FOR NEXT