मुंबई

ठाणे शहराचा आज पाणीपुरवठा बंद 

सकाळवृत्तसेवा

ठाणे - महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या १५९० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या अत्यावश्‍यक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने  आज (ता.१३) बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत (२४ तास) शिळ टाकी येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यादरम्यान कळवा प्रभाग समितीतील गणपतीपाडा, विटावा व कळव्याचा काही भाग आदी परिसराचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

तसेच ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिसे येथील पंपिंग स्टेशनच्या सबस्टेशनमध्ये ८ सप्टेंबरला वीज पडल्याने झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी, पाणी वितरण जलवाहिन्यांवरील एअर व्हॉल्व्हस्‌, गळतीची दुरुस्ती करण्यासाठी उद्या सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, ऋतूपार्क, उथळसर आदी ठिकाणचा पाणीपुरवठा उद्या सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहील. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT