मुंबई

Thane Politics: शरद पवार महाराष्ट्रातील 62 हजार शाळांच्या खाजगीकरणाचा समाचार घेणार!

Ulhasnagar : उल्हासनगरात संविधान हक्क परिषदेची महाएल्गार सभा : Mahaelgar meeting of Constitutional Rights Council at Ulhasnagar sharad pawar

दिनेश गोगी - सकाळ वार्ताहर

Sharad Pawar : महाराष्ट्रातील तब्बल 62 हजार शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमाच्या शाळांना दत्तक शाळा योजना या नवीन योजनेमार्फत खाजगीकरण करून त्या मोठ्या कंपन्यांना,दान शूर व्यक्तींना,संस्थाना विकण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने काही महिन्यापूर्वी घेतला असून तसा अध्यादेश दि.18 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे.

या निर्णयाचा विरोध करण्यासाठी संविधान हक्क परिषदेने सोमवारी 12 तारखेला उल्हासनगरात महाएल्गार सभेचे आयोजन केले असून त्यात नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शाळांच्या खाजगीकरणाचा समाचार घेणार आहेत.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या शाळांमध्ये गोरगरीब,आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय,खेड्या पाडयातील झोपडपट्टी,आदिवासी, ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेत असून आता शाळांच्या खाजगीकरणाच्या घाटामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या शाळेत मुलांना विनामूल्य शिकवण्यात येणार नसून त्यांच्याकडून मनमानी फी आकारली जाणार असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहणार आहे.

त्यामुळे यावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व हा खाजगीकरणाचा अध्यादेश रद्द करण्याच्या मागणी करिता संविधान हक्क परिषदेचे अध्यक्ष डॉ.रामचंद्र जाधव,निमंत्रक ऍडव्होकेट अनिल अहिरे,शंकर कांबळे,प्रकाश जाधव यांनी कॅम्प नंबर 5 येथील दसरा मैदानावर महाएल्गार सभेचे आयोजन केले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मूळ घड्याळ हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले आहे.अशावेळी शरद पवार हे 62 हजार शाळांच्या खाजगीकरणाचा समाचार घेण्यासाठी शहरात येत असून याप्रसंगी ते पक्षचिन्हा बाबत कोणती प्रतिक्रिया देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गंगाराम इंदिसें,शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश प्रदेश प्रवक्ते महेश तपासे,उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा समनव्यक धनंजय बोडारे,अंबरनाथ तालुका अध्यक्ष सदामामा पाटील,ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर पाटील,युवक अंबरनाथ तालुका अध्यक्ष कबीर गायकवाड शहर प्रमुख धनंजय सुर्वे,जेष्ठ पत्रकार किरण सोनावणे,महागायीका निशा भगत,दलित मित्र अण्णासाहेब रोकडे डॉ.संजीवनी कांबळे,अंबरनाथचे नगरसेवक मनोज गुप्ता आदी महाविकास आघाडीतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक ऍडव्होकेट अनिल अहिरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT