Viral Video Sakal
मुंबई

RTO अधिकाऱ्यांनी थेट रिक्षाचालकाला दिले कारवाईचे अधिकार? ठाण्यातील प्रकार; Viral Video पाहून धक्का बसेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यातील हा प्रकार समोर आला आहे.

दत्ता लवांडे

ठाणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्षाचालकांकडे मशीन देऊन इतर रिक्षांवर कारवाई करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ई-चलन काढण्यासाठी असलेली मशीन घेऊन रिक्षांवर कारवाई करताना दिसत आहे. तर व्हिडिओ काढणारा व्यक्ती 'तुमचे पद कोणते?, तुम्ही कोण आहात' असा प्रश्न विचारतो, त्यावर सदर व्यक्ती रिक्षाचालक असल्याचं सांगतो पण पदाबाबत त्याला उत्तर देता येत नाही. त्यानंतर तो आरटीओच्या उभ्या असलेल्या गाडीकडे जातो आणि सदर मशीन अधिकाऱ्यांच्या हवाली करतो.

सरकारी अधिकाऱ्यांकडे असणारी वस्तू एखाद्या व्यक्तीकडे देऊन कारवाई करून घेणे बरोबर आहे का? असा प्रश्न पोलिसांना विचारला असता पोलिस सुद्धा निरूत्तर होतात आणि 'मशीन आमच्याकडेच आहे' असं व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

दरम्यान, MH 04 KR 6476 असा या गाडीचा क्रमांक असून सदर गाडी ही ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फ्लाईंग स्क्वाडची असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात येत आहे. रिक्षाचालकांवर कारवाई करताना सरकारी मशीन एका रिक्षाचालकाकडे देऊन कारवाई करून घेणे कितपत योग्य आहे? असा सवाल व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT