अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने पवार यांनी शुक्रवारी मुंबई येथील ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. त्यात कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अडव
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने पवार यांनी शुक्रवारी मुंबई येथील ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. त्यात कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अडव 
मुंबई

नाकाबंदीने ठाणेकरांची कोंडी 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मेट्रोच्या कामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर होत असलेली "वाहतूक कोंडी' ठाणेकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. कोंडीच्या या नियमित त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत असतानाच, शुक्रवारी ईडीच्या निषेधार्थ मुंबईकडे निघालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह संपूर्ण ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. यामुळे मुंबईत कामावर निघालेल्या चाकरमान्यांना अडकून पडावे लागले. कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालकांनी आपला मोर्चा सर्व्हिस रोडकडे वळवल्याने सर्व्हिस रोडसुद्धा जाम झाले. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले; तर स्वतः पवारांनी शुक्रवारी मुंबईत ईडी कार्यालयात भेट देण्याचे ठरवल्याने राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने कूच करू लागले.

याच भीतीपोटी ठाणे पोलिसांनी पहाटेपासूनच मुंबईच्या प्रवेशद्वारावर कोपरी चेकनाका येथे नाकाबंदी करून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर थेट माजिवड्यापर्यंत आणि नाशिक-मुंबई मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. याचा फटका ठाणे शहरांतर्गत वाहतुकीला बसला. पोलिसांनी महामार्गासह सर्व्हिस रोडवरदेखील बॅरिकेड्‌स लावून तपासणी सुरू केल्याने सर्व्हिस रोडदेखील जाम झाले. 

याचा फटका घोडबंदर रोड व कोपरीतील शाळकरी विद्यार्थ्यांनाही बसला. अनेक बसेस व स्कूल वाहने वेळेत शाळेजवळ पोहोचू न शकल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट झाली. या कोंडीत कधी नव्हे त्या दुचाकीदेखील अडकल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासून सुरू झालेल्या कोंडीचा फटका सार्वजनिक बस सेवेलाही बसला. यामुळे घोडबंदर रोडवरून शहरात येणाऱ्या अनेक बेस्ट, टीएमटी आणि इतर परिवहनच्या बसेस रस्त्यावरच अडकल्याने बस थांब्यांवर प्रवासी ताटकळत राहिले होते. सायंकाळपर्यंत वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागल्याने नागरिकांनी पोलिसांच्या आणि सरकारच्या नावाने खडे फोडून दूषणे दिली. अनेकांनी समाज माध्यमांवर टीकास्त्र सोडले. 

रुग्णवाहिका अडकल्या 
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत येऊ नयेत यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर चेक नाक्‍यावर नाकाबंदी केली होती. या कोंडीचे लोण थेट घोडबंदर रोडपर्यंत पोहोचले. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसलाच किंबहुना या वाहतूक कोंडीत चार रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या. अखेर, पोलिसांनीच पुढाकार घेत या रुग्णवाहिकांना मार्ग काढून दिल्याने अनर्थ टळला. महामार्गावरील कोंडीची झळ शहरांतर्गत रस्त्यांना बसून तीनहात नाक्‍यानजीकच्या दमाणी इस्टेट, नौपाडा, हरिनिवास येथील उड्डाणपुलांवर वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. या कोंडीतही अनेक एक रुग्णवाहिका अडकली होती. 

मुंबईत जमावबंदी लागू केली होती. तेव्हा, नाशिकसह राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी काहीच क्‍लृप्ती किंवा दुसरे अस्त्रच नसल्याने नाकाबंदी करणे गरजेचे होते. या नाकाबंदीमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांचा वेग मंदावून वाहतूक खोळंबली. दुपारनंतर नाकाबंदी हटवण्यात आली. नागरिकांना त्रास झाला असला तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 
- अमित काळे, वाहतूक उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT