मुंबई

रंगभूमीनेच संधी, वाव आणि ओळख दिली : दिलीप प्रभावळकर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता म्हणून अनेक माध्यमांत मुशाफिरी केली; पण मी मूळचा रंगभूमीचाच. मला खरी ओढ नाटकाचीच होती. रंगभूमीनेच मला वाव, संधी आणि ओळख दिली, अशी कृतज्ञता ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संचालित मराठी नाट्य कलाकार मंचातर्फे भालचंद्र पेंढारकर स्मृतिप्रीत्यर्थ जागतिक रंगकर्मी दिन सोमवारी (ता. 25) माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आले. या समारंभाला मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे, उपाध्यक्ष शरद पोंक्षे, कार्यवाह सुशांत शेलार आदी उपस्थित होते. प्रभावळकर यांचे मनोगत अभिनेता अनिकेत विश्‍वासराव यांनी वाचून दाखवले. सन्मानपत्र आणि दीपस्तंभ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

या वेळी 75 वर्षे पूर्ण केलेल्या मराठी रंगभूमीवरील कलाकारांचा दीपस्तंभ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. प्रत्येक कलाकाराने कलाकार संघाला दरवर्षी हजार रुपये देणगी द्यावी; त्यातून कलाकारांसाठी मदत उभी करता येईल, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले. त्यानंतर विघ्नेश जोशी यांनी प्रभावळकर यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात ओंकार प्रभू घाटे, संपदा माने यांनी नाट्यसंगीताची मैफल रंगवली. पुष्कर श्रोत्री, विजय पटवर्धन, योगिनी पोफळे यांनी "हसवा फसवी' नाटकातील काही प्रसंग सादर केले. 

"शिकण्याचा प्रवास सुरूच' 
मी महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत होतो. छंद म्हणून केलेल्या अभिनयात माझे करिअर घडेल, असे वाटले नव्हते. मी नाट्यशास्त्राचे रितसर शिक्षण घेतलेले नाही; पण नाटके करताना खूप शिकायला मिळाले. तो माझ्यासाठी अभिनयाचा प्रदीर्घ कोर्स होता. आजही शिकण्याचा प्रवास सुरू आहे, असे दिलीप प्रभावळकर यांनी मनोगतात म्हटले आहे. इतर माध्यमांत स्थित्यंतरे घडली, तरी रंगकर्मी आणि रंगभूमी यांचे नाते उत्तरोत्तर दृढ होत जाईल. कलाकारांनी प्रेक्षकांचा आणि प्रेक्षकांनी कलाकाराचा मान राखला पाहिजे; तसेच प्रयोगाची शिस्त पाळली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT