BMC News Esakal
मुंबई

BMC News: मुंबई महापालिकेतले चमचेचोर! वर्षभरात मुंबई महापालिकेतील 6 ते 7 हजार चमचे चोरीला

वर्षभरात मुंबई महापालिकेतील 6 ते 7 हजार चमचे चोरीला गेल्यामुळे कंत्राटदार मेटाकुटीला

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई मुख्यालयाच्या उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताट, चमचे, वाट्या, ग्लास अशी शेकडो भांडी गायब झाली आहेत. पालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी जेवण आणि नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात. ती परत केली जात नाहीत.

दरम्यान अधिकारी घरी गेल्यानंतर ताट आणि चमचे चोरीला जातात. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली असून कंत्राटदारांच 40 ते 50 हजारांचं नुकसान झालं आहे. यावर उपाय म्हणून भांडी आणि चमचे घरी घेऊन जाऊ नका असा फलकही पालिका मुख्यालयामध्ये लावण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जे मुख्य कॅन्टीन आहे. त्यामध्ये 50 पेक्षा जास्त लोक बसू शकतात. मात्र याच महापालिकेमध्ये 50 पेक्षा अधिक विविध विभागाची कार्यालये आहेत. त्यामध्ये जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत. ते थेट कॅन्टीनमधील जेवण आणि भांडी घेऊन आपल्या कार्यालयात जातात. मात्र ही भांडी पुन्हा कॅन्टीनमध्ये परत येत नाहीत.

दरम्यान वर्षभरात आतापर्यंत त्याचा हिशोब काढला तर 40 ते 50 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. यामध्ये 6 ते 7 हजार चमचे, 150 ते 200 प्लेट, 300 ते 400 नाश्ता प्लेट, 100 ते 150 ग्लास ही भांडी गायब झाली आहेत. त्यामुळे थेट उपाय ग्रहाच्या समोरच्या बाजूसच भांडी घेऊन जाऊ नका! अशी सूचना लिहली आहे

उपहारगृहातून भांडी घेऊन जाऊ नका !

उपहारगृहातून हजारो चमचे, ताटे, ग्लास गायब झाल्याने यापुढे उपहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. तशी विनंती करणारा फलक कॅन्टीन मध्ये झळकवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT