Samajwadi Party
Samajwadi Party Sakal
मुंबई

मुंबई : पालिकेत निविदा प्रक्रियेतील सुधारासाठी थर्ड पार्टी एजन्सी नेमा; समाजवादी पार्टीची मागणी

सकाळ वृत्तेसवा

मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये सीसी रोडच्या निविदेसोबतच सांडपाणी प्रक्रिये केंद्र, नवीन जलवाहिन्या, मलःनिसारण केंद्र यासारख्या कामांचा समावेश आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी पालिका लवकरच प्रक्रियेत सुधारणा आणण्याच्या तयारीत आहे. विकासकामांसाटी निविदा प्रक्रिया राबवून घेतल्यानंतरही कंत्राटदार नियम धाब्यावर बसवून नित्कृष्ट दर्जाची कामे करतात. निविदा प्रक्रियेतील गुंतागुंती आणि जाचक अटींमुळे मोठ्या कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे पालिकेकडून आता निविदा प्रक्रियेत सुधारणा आणण्यात येणार आहे. कामांमध्ये गुणवत्ता आणण्यासाठी हा पुढाकार पालिकेकडून घेण्यात येत आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये सीसी रोडच्या निविदेसोबतच सांडपाणी प्रक्रिये केंद्र, नवीन जलवाहिन्या, मलःनिसारण केंद्र यासारख्या कामांचा समावेश आहे. येत्या काळात या सग्या निविदा प्रक्रियेतील जाचक अटी स्पर्धा वाढण्याच्या अनुषंगाने सुधारण्यात येणार आहे. त्यामुळे ठराविक कंत्राटदारांनाच मिळणारा आर्थिक फायदा होण्याचे प्रकार थांबतील.

पालिकेने कामाचा दर्जा सुधारण्यासाठी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन एजन्सीवर अधिक भर द्यायला हवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे माजी गटनेत रईस शेख यांनी केली आहे. त्यामुळे अशा एजन्सी दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या कंत्राटाच्या कामाने बदल करण्यात येणे अपेक्षित आहे. एकाच प्रकल्पावर दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी एजन्सीची नेमणूक नसावी. त्यामुळे एजन्सी आणि कंत्राटदार यांच्यातील आर्थिक संबंध नाहीत हे स्पष्ट होईल. मोठ्या करारांसाठी ईएमडी ०.५ टक्के कमी केला पाहिजे अशी मागणी रईस शेख यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT