Cidco
Cidco sakal media
मुंबई

नवी मुंबईचा होणार कायापालट; खोपटा विकास आराखड्यात ३२ गावांचा समावेश

नरेश शेंडे

नवी मुंबई : परिसरातील गावांचा कायापालट करण्यासाठी सिडकोने (cidco) खोपट्याच्या विकासासाठी व्यापक विकास आराखडा (khopta development plan) बनवला आहे. सिडकोने या विकास आराखड्यात नवी मुंबईतील तब्बल ३२ गावांचा (thirty two village included) समावेश केला आहे. खोपटाच्या विकासकामांसाठी विशेष नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) सिडकोची नियुक्ती केली आहे. नव्या टाउनशीपमध्ये पनवेल आणि उरण तालुक्याला समाविष्ट करण्यात आलं आहे. यात रायगडच्या पनवेल तहसील मधील ७ गावे तर उरणच्या २५ गावांचा समावेश केला आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Thirty two villages included in khopta development plan of cidco)

सिडकोने सहा गावांसाठी विकास आराखडा जाहीर केला होता. यामध्ये बारपाडा, कर्नाळा (तारा), डोलघर, कासरभट आणि दिघाटी या गावांचा समावेश आहे. डीसीआर (Development Control Regulations) २०१२ नुसार राज्य सरकारने विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.

"हा भाग अत्याधुनिक पायाभूत आणि सामाजिक सोयीसुविधांसह विकसित करण्यात येईल. यामुळे प्रस्तावित खोपटा न्यू टाउनच्या सुनियोजित आणि पद्धतशीर विकासाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळेल," असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT