Mumbai Goa Highway esakal
मुंबई

Mumbai Goa Block: मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या कसे असतील पर्यायी मार्ग?

दोन सत्रात घेण्यात येणार ब्लॉक

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोलाड जवळील पुई इथं म्हैसदरा नवीन पुलाचं गर्डर बसवण्याच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ११ ते १३ जुलै दरम्यान दोन सत्रांमध्ये बंद राहणार आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात या महामार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. (Three days block on Mumbai Goa highway need to know alternative routes)

ब्लॉकच्या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग -

१) वाकण फाटा इथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) वाकण फाटा इथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगांववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग -

१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) कोलाड इथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

सर्व प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT