Bhatsa Dam : भातसा धरणाचे तीन दरवाजे उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा sakal
मुंबई

Bhatsa Dam : भातसा धरणाचे तीन दरवाजे उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा

Thane Rain: 3 ऑगस्ट रोजी भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी. पवार यांनी सांगितले.

नरेश जाधव

Thane Latest Update: गेल्या 10/12 दिवसापासून शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भातसा धरण 3 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता भातसा धरणाची पातळी 138.00(88.87 टक्के)मीटर झाल्याने व हवामान खात्याने पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवल्याने भातसा धरणाचे तीन दरवाजे 3 जुलै ला संध्याकाळी 6.30 वाजता विधिवत पूजा-अर्चा करून 0.50 सेंटीमीटरने उघडण्यात आले असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांनी सांगितले.

भातसा धरणाच्या जल व लाभ क्षेत्रात पडणा-या पावसाचे प्रमाण सद्या वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य पाण्याचा साठा वाढला असल्याने धरणातील साठा नियंत्रणात ठेवण्यासाठी भातसा धरणाचे तीन गेट 0.50 सेंटीमीटरने उघडल्याने 3832.23 क्यूसेस

एवढा विसर्ग प्रवाहीत करण्यात आला असून पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर - मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील ग्रामपंचायत मधील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होत असलेबाबत व या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी.पवार यांनी सांगितले.

शहापूर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले असून तालुक्यातील तानसा,मोडकसागर यापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुंबईकरिता वर्षभर पुरण्याचा पाणीसाठा भातसा धरणात पूर्ण झाला असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेंशन दूर झाले आहे.धरणातील पाण्याचा साठा वाढून धरण ओव्हरफ्लो होऊ नये व धरणालगतच्या गावांना पुराचा फटका बसू नये यासाठी 3 ऑगस्ट रोजी भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी. पवार यांनी सांगितले.

पूजन कार्यक्रमावेळी कार्यकारी अभियंता रविंद्र पवार,उपअभियंता कंक व सहायक अभियंता शाम हंभीर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT