Tik-Tok
Tik-Tok 
मुंबई

टिकटॉकच्या नादात १४ वर्षांच्या मुलीने सोडले घर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - टिकटॉक ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याला भेटण्यासाठी घर सोडून नेपाळला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे समुपदेशन करून वडाळा पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत.

शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची दहावीत शिकणारी मुलगी समाजमाध्यमांवरील टिकटॉक ॲपवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याची चाहती आहे. ती दिवसभर आईच्या मोबाईलवर रियाजचे व्हिडीओ पाहायची. त्यावरून तिचे वडिलांसोबत वारंवार वाद व्हायचे. कुटुंबीयांनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. दिल्ली आणि नेपाळमध्ये रियाजचे कार्यक्रम असल्याची माहिती तिला मैत्रिणीने दिली. त्यानुसार तिने रियाजला भेटण्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

घरातून पलायन करण्यासाठी या मुलीने एक जोडी कपडे आणि ५००० रुपये जवळ ठेवले होते. १ जूनला पहाटे साडेचार वाजता कुटुंबीय झोपेत असताना ती घराबाहेर पडली. त्यानंतर तिने कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस गाठून सकाळी ६.१५ वाजता गोरखपूरकडे रवाना होणारी एक्‍स्प्रेस पकडली. शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्यामुळे कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांकडे धाव घेतली. 

दरम्यान, वडाळा पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून खांडवा येथील रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात ठेवले. त्यानंतर रविवारी वडाळा पोलिसांनी खांडवा येथे या मुलीचे समुपदेशन करून तिला मुंबईतील घरी आणले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT