Marathi-Bhasha-Divas
Marathi-Bhasha-Divas Sakal
मुंबई

मराठी भाषा दिन : डिजिटल युगात शासकीय मुद्रणालयाला ऑनलाईनचे वावडे

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील महापुरुषांचे चरित्र, कार्ये, इतिहास, चरित्र ग्रंथ, साहित्य, सांस्कृतिक प्रकाशने, संशोधन आदी विषयांवरील शेकडो पुस्तके, ग्रंथ राज्य शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या माध्यमातून प्रकाशित केली जातात. त्यांची विक्रीही केली जाते. मात्र, त्यासाठी पुस्तक आणि ग्रंथाला आयएसबीएन (इंटरनॅशनल स्टॅंडर्ड बुक नंबर) घेण्यात न आल्याने पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकलेली नाहीत.
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री आणि प्रकाशन संचालनालय शतकापासून कार्यरत आहे. आजवर महापुरुषांचे चरित्र ग्रंथ, साहित्य, सांस्कृतिक प्रकाशने, अधिनियम आणि नियम यांच्यासह विविध प्रकारची ३,५०० हून अधिक प्रकाशित करण्यात आली आहेत. साहित्य संस्कृती मंडळाचे ५४६ ग्रंथ, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे ३८ ग्रंथ, मराठी विश्वकोश मंडळाचे ११ खंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक प्रकाशन समितीकडून २३ खंडांचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकांना ‘आयएसबीएन’ प्राप्त न झाल्याने ही पुस्तके ऑनलाईनसाठी उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. याशिवाय संचालनालयाकडे ऑनलाईन पुस्तकविक्रीसाठी संकेतस्थळही नसल्याने वाचकांची निराशा होत आहे.

‘आयएसबीएन’ म्हणजे काय?
केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण व मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राजा राममोहन राय नॅशनल एजन्सी फॉर आयएसबीएन या संस्थेमार्फत इंटरनॅशनल स्टॅंडर्ड बुक नंबर म्हणजेच आयएसबीएन दिला जातो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या नंबरमुळे ऑनलाईन पुस्तक विक्री करणे सुलभ होते. पुस्तकाची नक्कल करणाऱ्यांना आळा बसतो. नंबरमुळे पुस्तकांची एक वेगळी ओळख असते.
शासकीय मुद्रणालयाच्या सर्वच पुस्तकांना आयएसबीएन नंबर मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल. शासकीय मुद्रणालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली सर्व पुस्तके जगभरातील वाचकांना उपलब्ध व्हावीत, यासाठी ती ऑनलाइन मिळावीत, यासाठीसुद्धा तातडीने प्रयत्न केले जातील.
- सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग

आमच्याकडे पुस्तकेही छपाईसाठी येत असतात. आयएसबीएन नंबर देणे हा त्या-त्या मंडळांच्या संदर्भातील विषय असतो; तरीही आम्ही हा नंबर देण्यासाठी संबंधित संस्थांना पत्रे दिली आहेत. सध्या ऑनलाईन पुस्तके उपलब्ध नसली, तरी आम्ही कुरिअरच्या माध्यमातून स्पीड पोस्टने पुस्तक पाठवणे सुरू करीत आहोत. शिवाय वर्षभरात संकेतस्थळही तयार केले जाईल.
- रू. दि. मोरे, संचालक, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dirty act in Restaurant: ईईई.. जेवणातील खाद्यपदार्थांवर घासायचा गुप्तांग अन् करायचा लघवी! मोठ्या हॉटेलमधील वेटरचं किळसवाणं कृत्य

Rohit Sharma : KKRच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माची सीक्रेट मीटिंग? अफवांच्या बाजारात चर्चांना उधान

Entertainment News: "क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2024 : विराट कोहली रचणार इतिहास! दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात एन्ट्री मारताच करणार 'हा' मोठा विक्रम

HRA Claim: वडिलांना मिळालेल्या सरकारी घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याला एचआरए मिळू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT