Mumbai-Goa Highway 
मुंबई

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवरून फटकारले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य सरकारला फटकारले. महामार्गाच्या कामाच्या प्रगती अहवाल ६ जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश विनय जोशी यांच्या खंडपीठाने दिले आहेत.(Mumbai-Goa Highway)

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असा दावा करणारी जनहित याचिका कोकणातील ॲड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला देण्यात आली. तसेच परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर खंडपीठाने काम रखडण्यामागची कारणे काय, अशी विचारणा राज्य सरकारकडे केली.

कोविड परिस्थितीमुळे कामे रखडली आहेत, असे सरकारी वकील रिना साळुंखे यांनी सांगितले. याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, सुनावणी ६ जूनपर्यंत तहकूब केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT