मुंबई

मुंबईतील हवेचा दर्जा घसरला

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : वाढती उष्णता, हवेचा मंदावलेला प्रवाह त्यात हवेत पसरलेली धूळ यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा एकदा घसरला असून हवा गुणवत्ता निर्देशांक २९७ असा ‘वाईट’ नोंदवला गेला. केवळ वरळी परिसरात हवेचा दर्जा उत्तम असून बाकी ठिकाणी प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्याचे दिसले.

शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक २९७ सह वाईट नोंदवला गेला आहे. मालाडमध्ये ३५३, माझगाव परिसरात ३२९, अंधेरीत ३१५, चेंबूर ३०९, भांडुप ३०३ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा दर्जा अतिशय वाईट नोंदवला गेला; तर बिकेसी २९३, कुलाबा २६२, बोरिवली २१९ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा दर्जा वाईट नोंदवला गेला. नवी मुंबई आणि वरळी प्रदूषणाची पातळी कमी आहे. नवी मुंबई १५९ सह मध्यम; तर वरळीमध्ये ९३ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा दर्जा उत्तम नोंदवला गेला.

सध्या उष्णता वाढली आहे. हवेचा वेगही मंदावला आहे. शिवाय हवेत पसरलेल्या धुळीमुळे हवेचा दर्जा घसरला आहे. असे असले, तरी त्याचा मोठा परिणाम जाणवणार नाही. हवेचा दर्जा दोन दिवसांत सुधारेल.
- गुफरान बेग, प्रकल्प संचालक, सफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Farmer Protest : अभिजीत दिपके आता शेतकरी आंदोलनात सामिल होणार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम सोबत असल्याचा दिला विश्वास

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

Crime: पुस्तक का नाही आणलंस? शिक्षिका चिडली, रागाच्या भरात पहिलीतील विद्यार्ध्याच्या कानशिलात लगावली नंतर... घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन

Ratnagiri Bhatye Breakwater Project : रत्नागिरीत 143 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! 'या' भागात सुरू होणार 'सी-प्लेन' सेवा; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT