मुंबई

जेईई-मुख्य व सीईटी परीक्षा एकाचवेळी

CD

मुंबई, ता. ११ : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मुख्य परीक्षा २०२२ सत्र १ आणि २ च्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. येत्या २० जूनपासून या परीक्षा सुरू होणार असून त्याच वेळी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी जून महिन्यात आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. शिवाय त्याच्या संभाव्य तारखाही जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
देशभरात जेईई मुख्य परीक्षा २०२२ सत्र १ आणि २ च्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. २१ एप्रिल रोजी होणारी ही परीक्षा आता २० ते २९ जून या कालावधीत होणार आहेत. याच कालावधीत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अंतर्गत येणाऱ्या सर्व सीईटींच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र तसेच कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेतील पीसीएम ग्रुपची परीक्षा ११ ते १६ जून आणि पीसीबी ग्रुपची परीक्षा १७ ते २३ जून या काळात होणार आहे. त्यामुळे राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांची अडचण होणार असून त्यामुळे राज्य सीईटी सेलने राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे.
--
सीईटी सेलच्या आयुक्तपदी गोतमारे
राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात पुण्यातील यशदाचे महासंचालक चिन्मय गोतमारे (भाप्रसे) यांची राज्य सीईटी सेलच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पात्रता परीक्षेची तयारी सुरू असून त्याच काळात गोतमारे यांना राज्य सीईटी सेलच्या आयुक्तपदी नेमण्यात आल्याने अधिकारी वर्गात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT