मुंबई

८५ कासवे पुन्हा नैसर्गिक अधिवासात

CD

मुंबई, ता. २४ : तस्करांच्या तावडीतून सोडवण्यात आलेल्या कासवांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. कासवांना उत्तर प्रदेशमध्ये नेण्यात आले असून त्यांना लखनौतील घरियाल रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील १५ दिवसांत कासवांची सुटका केली जाईल.

८५ कासवांमध्ये ब्लॅक स्पॉटेड पॉण्ड टर्टल, इंडियन रूफ टर्टल, ट्रायकेरिनेट हिल टर्टल, इंडियन टेंट टर्टल आदींचा समावेश आहे. या दुर्मिळ प्रजाती मानल्या जातात. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत सर्व प्रजाती संरक्षित आहेत. या कासवांचे वितरण गंगा नदीच्या खोऱ्यात होते आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत आणण्यापूर्वी त्यांना वेगळे ठेवणे आणि पुनर्वसन आवश्यक होते. रेस्क्यू सिटी पुणे टीमने कासवांना सुरक्षितपणे लखनौमधील घरियाल रेस्क्यू सेंटरमध्ये पोहोचवले. पुढील दोन आठवड्यात ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स, इंडिया ॲण्ड यूपी’ वन विभागाचे अधिकारी कासवांना अनुकूल वातावरणात सोडणार आहेत.

महाराष्ट्र वन विभागासह ठाणे, पुणे आणि नाशिकमधील विविध संस्थांनी कासवांची सुटका केली. २०२१ मध्ये राज्यव्यापी मोहिमेत त्यांना पुण्यातील रेप्टाईल ट्रान्झिट युनिटमध्ये ठेवण्यात आले. त्यांना वेगळे करून त्यांच्या संसर्गाची तपासणी करण्यात आली. त्यांच्या आहारावर लक्ष दिले गेले. वेगवेगळ्या प्रकारच्या हवामान परिस्थितीचा सामना करू शकतील यासाठी त्यांना तयार केले गेले.

घरियाल रेस्क्यू सेंटरमधील डॉ. शैलेंद्र सिंग आणि अरुणिमा सिंग यांच्या नेतृत्वाखाली कासव सर्व्हायव्हल अलायन्स टीम उत्तर प्रदेश वन विभागासह त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे. संरक्षित भागात सुयोग्य अधिवास शोधणे सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांतील आमच्या निरीक्षणानुसार सुमारे ६० टक्के कासवे जंगलात जगतात, असे डॉ. शैलेंद्र सिंग यांनी सांगितले.

पिंजऱ्यात आयुष्य घालवण्यापेक्षा कासवांना जंगलात सोडणे गरजेचे होते. वर्षभरात आम्ही २०० हून अधिक कासवांचे पुनर्वसन केले आहे. पुढेही काम सुरूच राहील.
- नेहा पंचमिया, संस्थापक-अध्यक्ष, रेस्क्यू सिटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ तुळजापूरमध्ये हजारोच्या संख्येने बंजारा समाज एकवटला

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT