मुंबई

अलिबाग ः बातमी पर्यटन स्थळाकडे जाणारा मार्ग खडतर

CD
खड्डेमय रस्त्याचा पर्यटनावर परिणाम नागावमधील व्यावसायिकांचे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे अलिबाग, ता. ६ (बातमीदार) : नागावमधील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा वाहतुकीवर परिणाम होत असल्याने कोंडीत भर पडत आहे. पर्यटकांना कोंडीचा त्रास होत असल्याने हॉटेल, कॉटेज व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. सततच्या या समस्येमुळे स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. नागाव हे ऐतिहासिक स्थळ असून एक धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. नागावला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. ऐतिहासिक, धार्मिक स्थळांसह येथील पर्यटन स्थळांचे दर्शनदेखील होत असल्याने सुट्टीच्या दिवशी नागाव समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जातो; परंतु अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नागाव समुद्र किनाऱ्यापर्यंत जाणाऱ्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करणे नकोसे होत आहे. त्यामुळे अनेक वेळा पर्यटक या मार्गावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. या खड्डेमय रस्त्यामुळे अपघातही होण्याची भीती निर्माण झाली असून धुळीमुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. चौकट स्थानिकांना फटका नागावमध्ये खड्ड्यांची समस्या निर्माण झाल्याने येथील व्यवसायही आर्थिक अडचणीत सापडू लागला आहे. याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे रस्त्यासाठी मागणी केली; परंतु हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले आहे, तर रस्ता वर्ग झाल्याचे पत्र अद्याप मिळाले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. या दोन विभागाच्या टोलवाटोलवीचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसू लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT