मुंबई

पालीवाला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

CD
पालीवाला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रायगड जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना पाली, ता. २७ (वार्ताहर) : रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालीतील शेठ जे एन. पालीवाला महाविद्यालयात बुधवारी (ता.२६) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या नवीन बॅचचे उद्‌घाटन उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सु. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गटविकास अधिकारी विजय यादव, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ अंजली पुराणिक होते. यावेळी रवींद्र लिमये यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा तयारी करताना शेवटपर्यंत तग धरून राहिले पाहिजे. तरुणांनी आपल्या क्षमता ओळखणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेबाबत माहिती मिळणे व प्रबोधन होणे आवश्यक आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला कसे अधिक साध्य करता येईल ते पाहावे. या परीक्षेसाठी जिद्द चिकाटी, परिश्रम व सातत्य हवे. विश्‍वजित काईंगडे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. अजित खरोसे यांनी केले. आभार प्राचार्या डॉ. अंजली पुराणिक यांनी मानले. उपप्राचार्य एम. एस. लिमन, सुधागड तालुका स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा. संतोष भोईर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल बेलवलकर, प्रा. ज्ञानेश्वर मुंडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT