School Education File Photo
मुंबई

अंबरनाथ : गणिताची गोडी लावणारी अनोखी प्रयोगशाळा

CD

माजी विद्यार्थ्यांकडून गुरुदक्षिणेत गणिताची प्रयोगशाळा जागतिक गणितदिनी अंबरनाथच्या गांधी शाळेत अनोखा सोहळा

अंबरनाथ, ता. २२ (बातमीदार) : डिजिटल बोर्ड, सॉफ्टवेअर प्रतिकृती, पावशेर अर्धा शेर मोजमापके आणि किचकट वाटणारे गणिताचे सिद्धांत... अभ्यासात अगदी ‘ढ’ असलेल्या विद्यार्थ्यालाही गणिताची गोडी लावणारी ही अनोखी प्रयोगशाळा अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात सुरू झाली आहे. निमित्त होते जागतिक गणित दिनाचे. विशेष म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गणिताच्या शिक्षकांसाठी ‘गुरुदक्षिणा’ म्हणून ही प्रयोगशाळा शाळेला भेट दिली आहे.

अंबरनाथ एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातील १९७७ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सवंगड्यांना गणित विषय सोपा जावा यासाठी अत्याधुनिक गणित कक्ष निर्माण केला आहे. त्याचे उद्‌घाटन शाळेतून २२ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले पी. के. चौधरी सर यांच्या हस्ते झाले. या वेळी अंबरनाथ भूषण डॉ. विवेकानंद वडके, संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर, स्नेहल करमरकर आदी या वेळी उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक दिवंगत भरत करमरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५५ विद्यार्थ्यांच्या योगदानातून ही गणित प्रयोगशाळा शाळेला भेट म्हणून देण्यात आली आहे. त्यासाठी पाच लाख ६६ हजारांचा खर्च आला आहे. भारतीय गणितीतज्ज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय गणितदिनी हा कार्यक्रम पार पडला. माजी मुख्याध्यापक धनंजय जठार, कार्यवाह सुधीर शूर्पाली, अशोक कुलकर्णी तसेच विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. भणगे यांनी सूत्रसंचालन; तर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बाळासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. चौकट गणिताचे महत्त्व अधोरेखित प्रयोगशाळेत पूर्वी दूध, रॉकेल, धान्य मोजण्यासाठी लागणारी शेर, पावशेर, अर्धा शेर आदी मोजमापांची साधने, याबरोबरच सध्याचे डिजिटल बोर्ड, गणितासाठी विशेष सॉफ्टवेअर प्रतिकृती, गणितातील तज्ज्ञांच्या कार्याची ओळख, प्रयोगातून कृतियुक्त अध्ययन याबरोबरच गणिताच्या विविध सिद्धांतांचे महत्त्व सांगून गणिताचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. या प्रयोगशाळेचा पहिली ते दहावीपर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कोट विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक बाबींवर शिक्षकांनी लक्ष द्यावे. दिवंगत विद्यार्थ्याच्या नावाने गणित प्रयोगशाळा सुरू केल्याचा उपक्रम वाखाणण्याजोगा असून सध्याच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल. - के. पी. चौधरी, निवृत्त शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT