मुंबई

फातिमा सना शेख झाली ट्रोल

CD
फातिमा सना शेख झाली ट्रोल दंगल गर्ल फातिमा सना शेख मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतर फातिमाचं नाव आमिर खानसोबत जोडलं जात आहे. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी या दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. या फोटोमुळेच दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण नंतर हा फोटो एडिट केलेला असल्याचं समोर आलं. पण आता फातिमा पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. फातिमा सना शेखने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. फातिमानं चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत इन्स्टाग्रामवर एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फातिमा खूपच सुंदर दिसत आहे. पण काही युजर्सनी मात्र तिच्या या फोटोवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. फातिमाच्या या फोटोचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. पण काही युजर्सनी थेट आमिर खानचं नाव घेत तिची खिल्ली उडवली आहे. फातिमाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘तू आमिरशी लग्न करतेयस?’ याशिवाय इतरही काही युजर्सनी फातिमाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात सोशल मीडियावर अशाप्रकारे ट्रोल होण्याची फातिमाची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिला अनेकदा आमिर खानमुळे ट्रोल केलं गेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT