मुंबई

शिवसेनेच्या कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी

CD
शिवसेनेच्या कार्यक्रमात कोरोना नियम पायदळी धारावी, ता. २९ (बातमीदार) : धारावी मुख्य रस्त्यावरील पालिकेच्या दवाखान्यास धारावीतील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दिवंगत मुत्तू तेवर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी कार्यक्रमास शिवसैनिक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र शासनाकडून कोरोना नियमांचे कडक पालन केले जावे, असे आवाहन केले जात असताना सत्ताधारी शिवसेना पक्षातर्फे मात्र कोरोना नियमांना हरताळ फसला गेला. अनेकांनी यावेळी तोंडाला मास्कसुद्धा लावलेला नव्हता. त्यामुळे कोरोना नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का, असा सवाल विचारला जात आहे. धारावीत शिवसेना वाढीचे भरीव काम करणारे मुत्तू तेवर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्या नगरसेवक असलेल्या पत्नी मरिअम्मल मुत्तू तेवर यांच्या प्रयत्नातून पालिकेच्या धारावीतील दवाखान्याचे नाव बदलून मुत्तू तेवर दवाखाना असे करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते व खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना महिला विभाग संघटिका नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक वसंत नकाशे, हर्षला मोरे, माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, शाखा प्रमुख मुत्तू पटन, जोसेफ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT