मुंबई

मुंबई विमानतळावर कोरोनाचा शिरकाव

CD
मुंबई विमानतळावर कोरोनाचा शिरकाव सीमा शुल्क विभागातील १५ अधिकारी कोरोनाबाधित सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महापालिका आणि अदानी ग्रुपच्या माध्यमातून आरटीपीसीआर तपासणी सुरू आहे. ज्यामध्ये सीमा शुल्क विभागातील १५ अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे; मात्र इतर अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी प्रलंबित असल्याने कोरोनाबधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विमानतळावर करचुकवेगिरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे काम सीमा शुल्क विभागाचे अधिकारी करतात. दैनंदिन विमानमार्गाने मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांपैकी संशयित प्रवाशांची तपासणी केली जाते. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या संपर्कात या अधिकाऱ्यांना यावे लागते. त्यातून हा संसर्ग झाला असण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. यामध्ये सीमा शुल्क विभागातील आयुक्त, सहायक आयुक्त आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकाऱ्यांची तपासणी आणि त्यांचे अहवाल प्रलंबित असून, सोमवारपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यतासुद्धा व्यक्त करण्यात येत आहे; मात्र सीमा शुल्क विभागाकडून अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT