मुंबई

एलपीजी टँकर-कार अपघातात चार जखमी, मुंबई-पुणे द्रुतगतीवरील शेअरिंग वाहतुकीवर प्रश्नचिन्ह

CD
एलपीजी टँकर-कार अपघातात चार जखमी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील शेअरिंग वाहतुकीवर प्रश्नचिन्ह सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर माडप बोगदा परिसरात एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकरला खासगी वाहनांतून शेअरिंग प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारची धडक बसली. रविवारी दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाला. यात ट्रकचालकासह कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. वाशी, खारघर, पनवेल आणि मुंबईहून पुण्यासाठी खासगी वाहनांमधून सर्रास शेअरिंग प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. सध्या एसटीची अंशतः प्रवासी वाहतूक सुरू आहे. संपामुळे राज्य सरकारने खासगी वाहनाला स्टेट कॅरेजचा दर्जा दिला आहे. मात्र, त्यामध्ये ज्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक केली जाते, त्यांना तपासण्याचे काम केले नाही. त्यामुळे एसटीच्या संपापूर्वीपासूनच मुंबई-पुणे ते पुणे-मुंबई मार्गावर सर्रास खासगी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यात वेळेची बचत करण्यासाठी वाहन चालक बेदरकारपणे वाहने चालवतात. मात्र, यावर कारवाई होत नसल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. रविवारी झालेल्या या अपघातामध्ये खासगी वाहनातील प्रवासी शेअरिंगने पुण्याला जात असतांना ही घटना घडली. टँकरला जोरदार धडक दिल्याने खासगी वाहन टँकरच्या आतमध्ये घुसले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, सामाजिक संस्थेचे सदस्य आणि खालापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे दाखल करण्यात आल्याचे मृत्युंजय दूत गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT