मुंबई

सेन्सेक्स ५९ हजारांवर

CD
सेन्सेक्स ५९ हजारांवर ९२९ अंशांची वाढ मुंबई, ता. ३ : देशांतर्गत आर्थिक स्थिती सुधारत असल्याने गुंतवणूकदारांनी आज शेअर्सची तुफान खरेदी केल्याने भारतीय शेअर बाजार निर्देशांक दीड टक्क्यांहून जास्त वाढले. सेन्सेक्स ९२९.४० अंश; तर निफ्टी २७१.६५ अंशांनी वाढला. या खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा ५९ हजारांचा टप्पा ओलांडला. आज दिवसअखेरीस सेन्सेक्स ५९,१८३.२२ अंशांवर; तर निफ्टी १७,६२५.७० अंशांवर स्थिरावला. निफ्टीच्या प्रमुख ५० शेअरपैकी फक्त सहा शेअरचे भाव पडले; तर सेन्सेक्समधील ३० मुख्य शेअरपैकी फक्त पाच शेअरचे भाव घसरले. आज बँका आणि वित्तसंस्थांचे शेअर वाढले; तर औषधनिर्मिती क्षेत्राच्या शेअरचे भाव पडले. डिसेंबरमधील जीएसटीचे विक्रमी संकलन, मोटारविक्रीची समाधानकारक आकडेवारी, उत्पादन क्षेत्रात झालेली वाढ आणि देशात अद्यापतरी फार मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन झाले नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवसात जोरदार तेजी अनुभवायला मिळाली. आज डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर ५५ रुपयांनी घसरून ४,८५३ रुपयांवर स्थिरावले. नेस्लेचे शेअर ३७ रुपयांनी घसरून १९, ६७१ रुपयांवर आले. टेक महिंद्र, टायटन व महिंद्र आणि महिंद्र हे शेअर किरकोळ घसरले. दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह ५८३ रुपयांनी वाढून १६,९७३ रुपयांवर; तर बजाज फायनान्स २४५ रुपयांनी वाढून ७,२२२ रुपयांवर गेला. आयसीआयसीआय बँक (बंद भाव ७६४ रु.), टाटा स्टील (१,१४३ रु.), इंडसइंड बँक (९१२), एचडीएफसी बँक (१,५१९), लार्सन अँड टुब्रो (१,९२२), टीसीएस (३,८१८), एचडीएफसी (२,६३५), रिलायन्स इंडस्ट्रीज (२,४०४), ॲक्सिस बँक, स्टेट बँक यांचे भाव वाढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT