मुंबई

मुंबई अहमदाबाद महामार्गावर कॉपर च्या ट्रकवर दरोडा टाकणारी ८ जणांची टोळी अटक

CD
दरोडा टाकणारी आठ जणांची टोळी गजाआड नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत गुजरात मार्गावर हवा तपासण्यासाठी उभ्या असलेल्या कंटेनरवर दरोडा टाकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला सोमवारी (ता. ३) अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरोडा टाकून या टोळीने कंटनेरचालकाला कारमध्ये बसवून कंटेनर पळवला होता. मुदसर रहेमान (३०), आत्ताउर सिद्दिकी (३९), जावेद हजीज (३१), इजाहार मुस्तफा (३६), शेख मुनीर (२४ सर्व रा. मालेगाव), मोहम्मद राजू शेख (३८), सादिक हसन (२७), रशीद फारुखी (४३, सर्व रा. भिवंडी) अशी आरोपींची नावे आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री १० च्या सुमारास खानिवडे टोलनाक्यापासून ५०० मीटर अंतरावर हवा तपासण्यासाठी उभा असलेल्या कॉपरच्या कंटेनर चालकाला जबदस्तीने धमकावून चौघांनी त्याला कारमध्ये बसवले. त्यानंतर टोळीतील एकाने ८४ लाख तीन हजार किमतीचा कॉपरने भरलेला ट्रक घेऊन तेथून धूम ठोकली. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखा कक्ष- ३ विरारचे प्रभारी पीआय प्रमोद बडाख यांच्या पथकाने तपास करून पाच आरोपींना मालेगाव आणि तीन आरोपींना भिवंडी येथून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT