मुंबई

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्याचे मुख्य सूत्रधार आमदार नितेश राणे आहेत

CD
शिवसैनिकावरील हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नीतेश राणे! राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा पोलिसांकडून तूर्तास कठोर कारवाई नाही सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ४ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारामध्ये शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आमदार नीतेश राणे आहेत, असा दावा आज मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने केला. दरम्यान, नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार असून तोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी पोलिसांकडून देण्यात आली. नीतेश राणे यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), १२० ‘ब’ सह ३४ (कटकारस्थान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारापासून दूर करण्यासाठी शिवसेनेने मला या प्रकरणात अडकवले आहे, असा आरोप नीतेश राणे यांनी केला आहे. यामध्ये माझा सहभाग नसून राजकीय वैमनस्यामधून फिर्याद नोंदवण्यात आली आहे, असा दावा त्यांनी अर्जामध्ये केला आहे. आज न्या. सी. व्ही. भडंग यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. राज्य सरकारने सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी न्यायालयात अवधी मागितला. ही मागणी मान्य करून न्या. भडंग यांनी पुढील सुनावणी दोन दिवसांनंतर म्हणजे शुक्रवारी दुपारी निश्चित केली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला यश मिळाले आहे. शिवसेनेचे सतीश सावंत पॅनेलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर प्रचारादरम्यान जीवघेणा हल्ला केला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्ल्यावरून आरोप-प्रत्यारोप शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी स्थानिक न्यायालयांनी यापूर्वी नीतेश राणे आणि संदेश सावंत यांचा जामीन फेटाळला आहे. केवळ राजकीय कारणांमुळे या प्रकरणात मला अडकवले आहे, असा युक्तिवाद नीतेश राणे यांच्या वतीने ॲड. संग्राम देसाई यांनी उच्च न्यायालयात केला; तर या हल्ल्यामागे राणे आहेत, असा पोलिसांचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT