मुंबई

कूपर रुग्णालयात परिचारीकांचा अभाव

CD
कूपर रुग्णालयातील परिचारिकांचे आंदोलन रिक्त जागा भरण्यासाठी ठिय्या सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ४ : परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत कूपर रुग्णालयातील नोबेल नर्सिंग युनियनच्या माध्यमातून मंगळवारी (ता. ४) कूपर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कूपर रुग्णालयात १८३ नर्सिंग स्टाफ आहे. आयसीयूतील १० रुग्णांमागे एक परिचारिका आहे. जनरल वॉर्डमध्ये सहा रुग्णांमागे एक परिचारिका काम करते. परिणामी त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. एका परिचारिकेस दोन विंगमध्ये काम करण्याचा दबाव टाकण्यात येतो. त्यामुळे परिचाकांना योग्य रीतीने कामाची जबाबदारी पार पडणे शक्य होत नसून त्यासाठी रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोना काळातील विलगीकरण रजा मंजूर करावी, दीर्घ काळापासून गैरहजर असणाऱ्या परिचारिकांवर कारवाई करावी, रिक्त पदे भरली जात नाही तोपर्यंत नव्याने सुरू करण्यात आलेले विभाग बंद ठेवावेत, रिक्त असलेली अधिसेविकेची जागा भरावी, शिकाऊ डॉक्टर कुठल्याही सूचनेचे पालन करत नाहीत याची रुग्णालय प्रशासनाने दखल घ्यावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी परिचारिकांनी डॉ. शैलेश मोहिते यांना पत्र दिले होते; मात्र मागण्या पूर्ण करण्याबाबत रुग्णालय प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करीत आज रुग्णालय आवारात ठिय्या आंदोलन केल्याचे नोबेल नर्सिंग युनियनच्या प्रतिनिधींनी सांगितले. तोडग्यासाठी समिती परिचारिकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असून परिचारिकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या सहकार्याने समिती स्थापन करण्यात येईल, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT