मुंबई

एनएमएमटी ला विरोध

CD
एनएमएमटीच्या सेवेमुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम नेरेच्या सरपंचांची फेऱ्या बंद करण्याची मागणी पनवेल, ता. १२ (प्रतिनिधी) ः एनएमएमटी बसच्‍या फेऱ्या वाढवण्यात आल्‍याने स्थानिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे नेरे परिसरातील सुरू करण्यात आलेल्‍या एनएमएमटी बसच्या फेऱ्या बंद करा, अशी मागणी नेरे ग्रामपंचायत सरपंच राजश्री म्हसकर यांनी एनएमएमटी व्यवस्थापनाकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र या मागणीमुळे नव्याने नेरे परिसरात राहायला आलेले नागरिक बुचकळ्यात पडले असून सरपंचाच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पनवेल तालुक्‍यातील नेरे परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असून लोकवस्‍ती वाढत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकापासून याठिकाणी ये-जा करण्यासाठी मोजक्याच सुविधा उपलब्ध असल्याने सुरवातीच्या काळात येथे राहण्यासाठी आलेल्या प्रवाशांना रिक्षा सेवेवर अवलंबून राहावे लागत होते. कालांतराने नवी मुंबई महापालिकच्या वतीने या भागात एनएमएमटीची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्‍यामुळे रिक्षा प्रवासी कमी झाल्‍याने रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने एनएमएमटीची नेरे येथील सेवा बंद करण्यात यावी, अशी मागणी नेरे ग्रामपंचायत सरपंचांनी केली आहे. रिक्षापेक्षा एनएमएमटी स्वस्त पनवेल रेल्वे स्थानक ते नेरेपर्यंत प्रवास करण्यासाठी एनएमएमटीकडून १३ रुपये तिकीट आकारले जाते. तर याच प्रवासासाठी रिक्षाचालक जादाचे भाडे आकारतात. त्यामुळे प्रवासी एनएनएमएमटीचा पर्याय स्वीकारत असल्याची माहिती नेरे परिसरात राहणारे प्रमोद पवार यांनी दिली आहे. ..... वाद उफाळण्याची शक्यता पनवेल परिसरात विकसित होत असलेल्या नव्या वसाहतीमध्ये एनएमएमटी सेवा सुरू करताना सुरवातीला रिक्षा चालकांनी मोठा विरोध केला होता. कालांतराने हा विरोध मावळला असला तरी सरपंचांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भविष्यात हा विरोध पुन्हा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT