मुंबई

सरकारी यंत्रणा ते सर्व सामान्य नागरिक प्लास्टिक सरार्स वापर करत असल्याचे उघड

CD
प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू केडीएमसीच्या प्लास्टिक निर्मूलन सप्ताहामध्ये अनेकांवर कारवाई कल्याण, ता. ९ (बातमीदार) ः कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ जानेवारी ते ९ जानेवारीदरम्यान प्लास्टिक निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या पालिका मुख्यालय ते सर्वसामान्य नागरिक, दुकानदार यांच्याकडून सुमारे पाच लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे सरकारी यंत्रणा ते सर्वसामान्य नागरिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रक्तदान शिबिर उद्‍घाटन सोहळ्यात प्लास्टिकचा वापर केला म्हणून सुरक्षा विभागप्रमुख उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या विभागाकडून सुमारे पाच हजार रुपयांचा दंड वसूल करून सप्ताहाची सुरुवात झाली. या कारवाईमुळे पालिका मुख्यालय आणि प्रभाग क्षेत्र कार्यालयामधील प्लास्टिकमुक्तीची मोहीम सुरू झाली. महापालिका अनेक उपाययोजना राबवत असून घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे आणि त्यांच्या टीमने शहरातील भाजी मंडईमध्ये फेरफटका मारून तेथील भाजी विक्रेत्यांमध्ये प्लास्टिकविरोधात जनजागृती केली. त्याचप्रमाणे स्वत: प्रभाग परिसरात फिरून नागरिकांमध्ये प्लास्टिकमुळे उद्‍भवणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. ---- पालिका हद्दीत १० प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. ३ जानेवारी रोजी २९ किलो प्लास्टिक जप्त करत १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ४ जानेवारी रोजी ९६ किलो प्लास्टिक जप्त करून ७० हजार रुपये दंड, ५ जानेवारी रोजी ६६.६ किलो प्लास्टिक जप्त करून ९० हजार रुपये दंड, ६ जानेवारी रोजी ७६ किलो प्लास्टिक जप्त करत एक लाख पाच हजार रुपये दंड, ७ जानेवारी रोजी ६२.५ किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे एक लाख ३५ हजार रुपये दंड, ८ जानेवारी रोजी ५६ किलो प्लास्टिक जप्त करून एक लाख ५५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT